जय भिम डॉ. आंबेडकर स्मारक समिती रामटेक द्वारे पथनाट्याने शासकीय योजनेची जनजागृती

Must Read

कन्हान : जय भिम डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक आणि जिल्हा माहीती व जनसंपर्क महासंचालनालय नागपुर यांच्या संयुक्त विद्यमान पार शिवनी तालुक्यातील वराडा, टेकाडी, गोंडेगाव गावात पथनाट्याच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना विषयी माहिती शेवटचा घटकापर्यंत पोहचवुन कल्या णकारी योजनाचा लाभ घेण्याचे संस्थे व्दारे आवाहन करण्यात आले.

बुधवार (दि.१५) ला जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक आणि जिल्हा माहि ती व जनसंपर्क महासंचालनालय नागपुर च्या संयुक्त विद्यमान पारशिवनी तालुक्यातील वराडा, टेकाडी व गोंडेगाव गावात पथनाट्याच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजना विषयी माहिती समाजातील शेवटचा घटकापर्यंत पोहोचविण्यात आली. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत जसे अनुसूचित जाती, जनजाती, भटका विमुक्त जाती व इतर मागासवर्ग या समाजातील गटाकरता शासनाने अनेक योजनांची आखणी केलेली आहे उदा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना, कर्म वीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण, स्वाभिमान योजना, वस्तीगृहे, सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण, सामुहिक विवाह, कन्यादान आदी योजनांची माहिती उपरोक्त संस्थेचे कलावंत शाहीर अलंकार टेंभुर्णे व त्यांचे संपुर्ण सहकारी यांनी आपल्या पथनाट्याच्या माध्यमातुन शासनाच्या कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचुन जनजागृती केली. या शासनाच्या कल्या णकारी योजनांचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा केले. सदर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार संस्थेचे सचिव शाहीर अलंकार टेंभुर्णे यांनी व्यकत केले.

बी एन ए न्यूज 24, प्रतिनिधी दीपचंद शेंडे
रामटेक

Latest News

सोनियाडीह में योग व न्यौता भोज का हुआ आयोजन

विकासखण्ड बिलाईगढ़ के मिडिल स्कूल सोनियाडीह में योग एवं न्यौता भोज का आयोजन हुआ। जिसमें सम्मानीय गिरवर निराला जी...

More Articles Like This